AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाच राज्यातल्या निवडणुकांसाठी शरद पवार मैदानात, प्रेस कॉन्फरन्समध्ये मेगा प्लॅन मांडला

पाच राज्यातल्या निवडणुकांसाठी शरद पवार मैदानात, प्रेस कॉन्फरन्समध्ये मेगा प्लॅन मांडला

| Edited By: | Updated on: Jan 11, 2022 | 11:18 PM
Share

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केलीय. राष्ट्रवादी काँग्रेस तीन राज्यात विधानसभा निवडणूक लढवणार आहे. त्यात उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर या राज्यांचा समावेश आहे. महत्वाची बाब म्हणजे यावेळी पवारांनी आपण स्वत: उत्तर प्रदेशचा दौरा करणार असल्याचं जाहीर केलंय.

मुंबई : लोकसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या (5 State Assembly Elections) रणधुमाळीला आता सुरुवात झाली आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठी घोषणा केलीय. राष्ट्रवादी काँग्रेस तीन राज्यात विधानसभा निवडणूक लढवणार आहे. त्यात उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर या राज्यांचा समावेश आहे. महत्वाची बाब म्हणजे यावेळी पवारांनी आपण स्वत: उत्तर प्रदेशचा दौरा करणार असल्याचं जाहीर केलंय.