Special Report | शरद पवारांनी घेतलं दुरुन बाप्पाचं दर्शन, मांसाहाराचं कारण!
पवारांनी बाप्पाचं दर्शन बाहेरुनच घेतल्यानं पुन्हा एकदा चर्चेला ऊत आलाय. मात्र, पवार यांनी मांसाहार केल्यानं ते मंदिरात गेले नाहीत, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितलं.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. मात्र, पवारांनी बाप्पाचं दर्शन बाहेरुनच घेतल्यानं पुन्हा एकदा चर्चेला ऊत आलाय. मात्र, पवार यांनी मांसाहार केल्यानं ते मंदिरात गेले नाहीत, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितलं. पवारांनी बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी प्रतिक्रिया दिलीय. शरद पवारांनी आज गणपतीचं दर्शन घेतलं याचा आम्हाला आनंद आहे. मांसाहार केल्यानं पवार मंदिरात गेले नाहीत ही भाविकतेची सर्वोच्च पायरी आहे, असंही आनंद दवे म्हणाले.
Published on: May 27, 2022 09:55 PM
Latest Videos
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
