एक कॅबिनेट मंत्री म्हणजे सरकार नसतं, आम्ही नरेंद्र मोदी, अमित शाहांशी बोलू: संजय राऊत

शिवसेना नेते संजय राऊत भुवनेश्वरचा दौरा अर्धवट टाकून घाईघाऊने मुंबईत आले आहेत. यावेळी त्यांनी विमानतळावरच मीडियाशी संवाद साधला.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Aug 26, 2021 | 1:35 PM

शिवसेना नेते संजय राऊत भुवनेश्वरचा दौरा अर्धवट टाकून घाईघाऊने मुंबईत आले आहेत. यावेळी त्यांनी विमानतळावरच मीडियाशी संवाद साधला. महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल होऊ देणार नाही, असं विधान नारायण राणे यांनी केलं होतं. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. काय करायचं आणि काय नाही हे ठरवणारे ते कोण? आम्ही आणि मोदी पाहून घेऊ काय करायचं ते. कोणीही काहीही विधान करत असेल तर त्यावर बोललंच पाहिजे असं नाही. केवळ एक कॅबिनेट मंत्री म्हणजे सरकार नाही. आम्हाला बोलायचंच असेल तर आम्ही नरेंद्र मोदींशी बोलू. अमित शहांशी बोलू. राष्ट्रपतींशी बोलू, असं सांगतानाच कुणाच्याही विधानावर प्रतिक्रिया दिल्याच पाहिजे असं नाही. आमच्याकडे कामं आहेत, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें