Shivsena Banner | मातोश्री परिसरात बॅनरबाजी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह; उद्या कोण दाखवणार ताकद?
शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन उद्या मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे, यानिमित्ताने मुंबईत दोन्ही शिवसेना गटांकडून जोरदार तयारी सुरू आहे. गेल्या दोन-तीन वर्षांप्रमाणे यंदाही शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) स्वतंत्रपणे वर्धापन दिन साजरा करणार आहेत.
शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन उद्या मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे, यानिमित्ताने मुंबईत दोन्ही शिवसेना गटांकडून जोरदार तयारी सुरू आहे. गेल्या दोन-तीन वर्षांप्रमाणे यंदाही शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) स्वतंत्रपणे वर्धापन दिन साजरा करणार आहेत.
वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील कलानगर आणि मातोश्री परिसरात दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली आहे. परिसरात विविध ठिकाणी पक्षाच्या नेत्यांचे फलक आणि स्वागत बॅनर्स झळकत असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
शिवसेना (शिंदे गट) यांचा वर्धापन दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या संध्याकाळी गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी राज्यभरातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
तर दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम सायन येथील षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमासाठीही पक्षाकडून जोरदार तयारी सुरू असून, मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दोन्ही गटांकडून वर्धापन दिनाच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू असल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष या कार्यक्रमांकडे लागले आहे. आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांच्या नेत्यांची भाषणे आणि भूमिका महत्त्वाची ठरणार आहेत.
Published on: Jun 18, 2026 01:47 PM
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक

