Arjun Khotkar यांनी काय दिला नेमका संकेत; म्हणाले, ‘दोन दिवस थांबा…’
VIDEO | मराठा आरक्षणासंदर्भात शिष्टाई करणारे माजी राज्यमंत्री आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी अर्जून खोतकर यांनी मराठा आरक्षणासंदर्भात मोठे संकेत दिले आहे. अर्जून खोतकर नेमकं काय म्हणाले?
जालना, ९ सप्टेंबर २०२३ | मराठा आरक्षणासंदर्भात शिष्टाई करणारे माजी राज्यमंत्री आणि राज्य सरकारचे प्रतिनिधी अर्जून खोतकर यांनी मराठा आरक्षणासंदर्भात मोठे संकेत दिले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या मागण्याचा विचार करत सरकार एक नाही तर चार पाऊलं पुढं गेलं आहे. जो १०० टक्के पारा होता तो आता ८० टक्क्यांवर येऊन संपलेला आहे. आणि आता फक्त २० टक्के पारा राहिला आहे, असे ते म्हणाले. तर सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासाठीही मनोज जरांगे ठाम आहेत. यावर बोलताना अर्जून खोतकर म्हणाले, जो काही निर्णय असेल तो राज्य सरकार घेईल, मी केवळ मुख्यमंत्री आणि जरांगे पाटील यांच्यातील दुवा आहे. त्यामुळे कोणतीही घाई करू नका, थोडं थांबा. दोन दिवसात बातमी गोड मिळेल, असे म्हणत त्यांनी नेमके कोणते संकेत दिले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

