तुमची उंची किती? पगार किती? औकात काय? बोलता किती गुलाबराव पाटील भडकले; कुणाला फटकारलं?
'नरेंद्र मोदी हे भगवान, ते पराभूत झाले आहेत. मोदी हा आतापर्यंत चेहरा होता त्यांची गॅरंटी संपली असल्याचे संजय राऊत म्हणाले. तर राऊत पुढे असेही म्हणाले की, मोदी ब्रँड संपला आहे, ईडी सीबीआयने जेवढं बहुमत आहे तेवढ आणले आहे. चंद्राबाबू नायडू आणि नितेश कुमार हे दोन जे बांबू आहेत त्यांच्यावर ते सरकार बनवणार आहेत. पण ते कधी पण हलू शकते', संजय राऊतांचा हल्लाबोल
लोकसभा निवडणुकीच्या निकालात एनडीएला बहुमत मिळालं असलं तरी भाजपचा बऱ्याच राज्यात दारूण पराभव झाला आहे. याच मुद्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपवर निशाणा साधला आहे. 240 हा भाजपचा आकडा नाही हा तर ईडी सीबीआयचा आकडा आहे. नरेंद्र मोदी हे भगवान, ते पराभूत झाले आहेत. मोदी हा आतापर्यंत चेहरा होता त्यांची गॅरंटी संपली असल्याचे संजय राऊत म्हणाले. तर राऊत पुढे असेही म्हणाले की, मोदी ब्रँड संपला आहे, ईडी सीबीआयने जेवढं बहुमत आहे तेवढ आणले आहे. चंद्राबाबू नायडू आणि नितेश कुमार हे दोन जे बांबू आहेत त्यांच्यावर ते सरकार बनवणार आहेत. पण ते कधी पण हलू शकते. मोदी यांचे नाक कापले गेले आहे त्यामुळे विना नाकवाला पंतप्रधान आम्हाला नको, असे म्हणत राऊतांनी भाजपला डिवचलं होतं. यावर शिवसेनेचे नेते आमदार गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया देत संजय राऊतांवर प्रश्नांची सरबत्तीच केली आहे. पंतप्रधान मोदींवर बोलावं… आपली उंची किती? आपला पगार किती? आपली औकात काय? बोलवं किती? असे सवाल केले आहेत इतकंच नाहीतर संजय राऊत यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीला उभं राहिला पाहिजे होतं. का उभे राहिले नाहीत? असा थेट सवालही पाटलांनी राऊतांना केला.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला

