मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल : “शिंदेंच्या जीवावर खासदार झाले”
शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘संजय राऊत शिंदेंच्या जीवावर खासदार झाले’, असा दावा कायंदे यांनी केला. ज्यांनी कधीही निवडणूक लढवली नाही, त्यांनी आम्हाला शिकवू नये, असा टोलाही त्यांनी लगावला. ‘संजय राऊत यांच्यासारखा बोगस माणूस भारतात कुठेही नाही. त्यांनी कधी वॉर्डाची निवडणूकही लढवली नाही. निवडणुकीचा फॉर्म कसा भरतात, […]
शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘संजय राऊत शिंदेंच्या जीवावर खासदार झाले’, असा दावा कायंदे यांनी केला. ज्यांनी कधीही निवडणूक लढवली नाही, त्यांनी आम्हाला शिकवू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.
‘संजय राऊत यांच्यासारखा बोगस माणूस भारतात कुठेही नाही. त्यांनी कधी वॉर्डाची निवडणूकही लढवली नाही. निवडणुकीचा फॉर्म कसा भरतात, हेही त्यांना माहिती नाही,’ अशी टीका मनिषा कायंदे यांनी केली.
निवडणूक आयोगावर संजय राऊतांकडून उपस्थित करण्यात येणाऱ्या प्रश्नांवरही कायंदे यांनी निशाणा साधला. ‘संजय राऊत खासदार कोणाच्या जीवावर झाले? ते शिंदेंच्या जीवावर खासदार झाले,’ असं म्हणत त्यांनी राऊतांवर हल्लाबोल केला.
Published on: Aug 14, 2026 11:16 AM
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...

