तर तुम्हाला कपडे काढून फिरायला लावीन, संजय शिरसाट यांचा उद्धव ठाकरे यांना इशारा
VIDEO | येत्या २ एप्रिल रोजी संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची पहिली संयुक्त सभा, सभेपूर्वीच संजय शिरसाट यांचा ठाकरेंना इशारा, काय म्हणाले बघा
मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. यानंतर सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाकडे देखील याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर तात्काळ आयोगाकडून दखल घेण्यात आली असून कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे. मात्र सुषमा अंधारे यांच्यासाठी वादग्रस्त शब्द वापरलेच नव्हतं, असं स्पष्टीकरण संजय शिरसाट यांनी टिव्ही ९ मराठीवर दिले आहे. अशातच येत्या २ एप्रिल रोजी संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची पहिली संयुक्त सभा होणार आहे. संजय शिरसाट हे छत्रपती संभाजीनगरचे आमदार असल्याने या सभेत पहिलं टार्गेट संजय शिरसाट हेच असतील, हे स्पष्ट दिसतंय. दरम्यान, यासभेच्या पूर्वीत संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाला इशारा दिला आहे. माझे कपडे काढायला लावले तर मी तुम्हाला सगळे कपडे काढून फिरायला लावीन. मी इथपर्यंत संघर्ष करून आलोय. अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिलेत. तुमच्या सगळ्या आरोपांना मी तत्काळ मुख्यमंत्र्यांच्या ८ तारखेच्या सभेत उत्तर देईन, असे म्हणत शिरसाट यांनी थेट इशारा दिला आहे.
Published on: Mar 28, 2023 04:17 PM
माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
