Video | रामदास कदमांना ओपन चॅलेंज, उद्यापासून राज्यात फिरून दाखवा, महिला नेत्या म्हणतात I Challenge you…
शिवसेना नेत्यांनी तुमच्यावर टीका केली असेल पण तुमच्या कुटुंबावर कुणी घसरलं नाही. तरीही तुम्ही वैयक्तिक पातळीवर घसरता? सरड्यापेक्षा जास्त वेगानं तुम्ही रंग बदलतायत, असं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलं..
मुंबईः रामदास कदमांच्या (Ramdas Kadam) विरोधात उद्यापासून शिवसेनेकडून राज्यभरात आंदोलन (Protest) सुरु होत आहेत, अशी माहिती शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी दिली. कदम यांच्या वक्तव्यावरून दुखावलेले शिवसैनिक उद्यापासून रामदास कदम यांना राज्यात फिरू देणार नाहीत, असा इशाराही सुषमा अंधारे यांनी दिला आहे. ज्या मराठवाड्यात तुम्ही शिवसेना संपर्कप्रमुख होतात, त्याच मराठवाड्यातील लातूर आणि बीडमध्ये, तुम्ही खरंच येऊन दाखवा, असं वक्तव्य त्यांनी केलंय… शिवसेना नेत्यांनी तुमच्यावर टीका केली असेल पण तुमच्या कुटुंबावर कुणी घसरलं नाही. तरीही तुम्ही वैयक्तिक पातळीवर घसरता? सरड्यापेक्षा जास्त वेगानं तुम्ही रंग बदलतायत, असं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलं..
ज्यांच्या मांडीवर जाऊन बसताय.. तीच लोकं तुमचा पगार किती… तुमची निष्ठा किती असा सवाल करत होते, पण त्याकडेही तुम्ही लक्ष देत नाहीयेत, असं वक्तव्य करत सुषमा अंधारे यांनी भाजपसहित रामदास कदमांवर हल्लाबोल केला.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!

