AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena Thackeray Protest | महागाईने जनतेचं कंबरडचं मोडलं; ठाकरेंच्या सेनेने रस्त्यावर उतरून सरकारला घेरलं!

Shivsena Thackeray Protest | महागाईने जनतेचं कंबरडचं मोडलं; ठाकरेंच्या सेनेने रस्त्यावर उतरून सरकारला घेरलं!

| Updated on: Jun 04, 2026 | 1:39 PM
Share

मुंबईतील गोरेगाव परिसरात वाढत्या महागाईविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडले आहे. महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले असून सरकारने तातडीने महागाई नियंत्रणात आणावी, ही प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे.

मुंबईतील गोरेगाव परिसरात वाढत्या महागाईविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडले आहे. महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले असून सरकारने तातडीने महागाई नियंत्रणात आणावी, ही प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे. या आंदोलनात शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. वाढत्या इंधनदर, जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमती आणि सर्वसामान्यांवर पडणारा आर्थिक ताण याकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.

आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, महागाईमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. जनतेच्या मनातील ही खदखद सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि वाढत्या महागाईचा निषेध नोंदवण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यभरात महागाई, बेरोजगारी आणि वाढत्या जीवनावश्यक खर्चाच्या मुद्द्यांवर विरोधकांकडून सरकारविरोधात आंदोलनांची मालिका सुरू असून, गोरेगावमधील हे आंदोलनही त्याचाच एक भाग मानले जात आहे. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळाले.

Published on: Jun 04, 2026 01:39 PM

Follow Us
सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी...

सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी..

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर...

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर..

मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त.

मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त

CJP Protest: प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला… युवराज सिंगकडून संताप व्यक्त, आंदोलनाबाबत स्पष्टच बोलला.

CJP Protest: प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला… युवराज सिंगकडून संताप व्यक्त, आंदोलनाबाबत स्पष्टच बोलला

जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक.

जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक

पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना.

पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना