NITIN DESAI : शिवसेना खासदारांचा सर्वात मोठा आरोप, “मोदी यांच्या जवळच्या ‘त्या’ शहामुळे नितीन देसाई यांनी जीवन संपवले”
नितीन देसाई यांची कर्जाची परतफेड प्रामाणिकपणे करण्याची तयारी होती. पण, नवीन पार्टनर घ्यायला परवानगी न देता त्यांना मानसिक त्रास देण्याचे काम फायनान्स कंपनीने चालू केलं होतं.
रत्नागिरी । 6 ऑगस्ट 2023 : कलादिगर्शक नितीन देसाई यांनी आपल्या स्टुडिओमध्ये काही पार्टनर घेण्याचे ठरवलं होतं. पण, हे पार्टनर घ्यायला फायनान्स कंपनीने परवानगी दिली नाही. कंपनीने सातत्याने कर्जाचा बोजा वाढवत ठेवला. नितीन देसाई यांची कर्जाची परतफेड प्रामाणिकपणे करण्याची तयारी होती. पण, नवीन पार्टनर घ्यायला परवानगी न देता त्यांना मानसिक त्रास देण्याचे काम फायनान्स कंपनीने चालू केलं होतं. अनेक केंद्रीय एजन्सीच्या माध्यमातून नितीन देसाई यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यामुळेच वैफल्य ग्रस्त झालेल्या नितीन देसाई यांनी जीवन संपवल. त्या फायनान्स कंपनीचा मालक रशीद शहा यांचा उद्देश एकच होता तो म्हणजे नितीन देसाई यांची मालमत्ता हडप करायची. तो जो ‘शहा’ आहे तो भाजपाच्या आणि नरेंद्र मोदी यांच्याजवळचा होता असं त्यांचेच लोक सांगतात असा आरोप शिवसेना खासदार विनय राऊत यांनी रत्नागिरी येथे पदाधिकारी मेळाव्यात बोलताना दिला. गुजराती भांडवलदारांकडे आम्ही नितीन देसाई यांचा स्टुडिओ जाऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
Published on: Aug 06, 2023 11:51 PM
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
