Sanjay Raut | दिलीप मोहितेंना नेमका कसला माज? महाविकास आघाडी असो की नसो, त्यांना पाडणार: संजय राऊत

Sanjay Raut | दिलीप मोहितेंना नेमका कसला माज? महाविकास आघाडी असो की नसो, त्यांना पाडणार: संजय राऊत

पुणे: राज्यात तिन्ही पक्षात उत्तम समन्वय आहे. आघाडीत जराही मतभेद नाहीत. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते-पाटलांसारखे काही लोक कुरबुरी करत आहेत. मोहिते-पाटलांचा वारू उधळला आहे. पण आम्हीही बांगड्या भरल्या नाहीत. आमच्या स्वाभिमानाचा प्रश्न येतो तेव्हा आम्ही काय करू शकतो हे दाखवून देऊ, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे. दिलीप मोहितेंना नेमका कसला माज आहे? महाविकास आघाडी असो की नसो, त्यांना विधानसभा निवडणुकीत पाडणार असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI