Breaking | राजकारणात पैसा बोलतो, भाजपच्या देणग्यांवर ‘सामना’तून टीका

सध्याचे राजकारण हा फक्त पैशांचा खेळ झाला आहे. तत्त्व, विचार, राष्ट्र या संकल्पना मागे पडल्या आहेत. पैसा फेको तमाशा देखो हा नवा खेळ गेल्या काही वर्षांपासून सुरू झाला आहे. (Shivsena Sanjay Raut Saamana Editorial on political parties Donations)

मुंबई : सध्याचे राजकारण हा फक्त पैशांचा खेळ झाला आहे. तत्त्व, विचार, राष्ट्र या संकल्पना मागे पडल्या आहेत. पैसा फेको तमाशा देखो हा नवा खेळ गेल्या काही वर्षांपासून सुरू झाला आहे. तुझी जात कोणती हा पहिला प्रश्न उमेदवारास विचारला जातो. खर्च करण्याची ताकद किती? हा दुसरा प्रश्न. त्यामुळे जात आणि पैसा या दोन प्रमुख गोष्टी सध्या निवडणुकीच्या राजकारणात जोरात आहेत, असं म्हणत आजच्या सामना अग्रलेखातून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राजकीय पक्षांच्या मागील वर्षाच्या देणग्यांवर प्रकाश टाकला आहे. (Shivsena Sanjay Raut Saamana Editorial on political parties Donations)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI