सिंधुताई सपकाळ यांनी अनेकांना जगण्याची प्रेरणा दिली – चंद्रकांत पाटील
अनाथांचा आधार, हजारो लेकरांची माय अशी ओळख असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचं पुण्यात दु:खद निधन (Passes Away) झालं आहे. सिंधुताई यांच्या निधनाने देशाची मोठी हानी झाल्याची भावना चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
पुणे : अनाथांचा आधार, हजारो लेकरांची माय अशी ओळख असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal) यांचं पुण्यात दु:खद निधन (Passes Away) झालं आहे. त्या 75 वर्षांच्या होत्या. पुण्यातील गॅलक्सी रुग्णालयात (Galaxy Hospital) त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते. सिंधुताई यांच्यावर महिनाभरापूर्वी हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. सिंधुताई यांच्या जाण्याने देशाची मोठी हानी झाली आहे. त्यांचे जाणे हे धक्कादायक असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..

