Video : ‘मी वसंतराव’ निमित्ताने राहुल देशपांडेंसह सिनेमाच्या टीमसोबत खास बातचीत, पाहा व्हीडिओ…
‘मी वसंतराव’ हा सुरांची सांगितिक मैफील असलेला चित्रपट गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच 1 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तुमचं घराणं कोणतं? या खोचक प्रश्नावर ‘माझं घराणं हे माझ्यापासूनच सुरू होतं’ हे धाडसी उत्तर देण्याची ताकद असलेल्या पं. वसंतराव देशपांडे यांनी स्वत:ला गायकीतून सिद्ध केलं. पंडित वसंतराव देशपांडे हे एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व. शास्त्रीय संगीतानं […]
‘मी वसंतराव’ हा सुरांची सांगितिक मैफील असलेला चित्रपट गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच 1 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तुमचं घराणं कोणतं? या खोचक प्रश्नावर ‘माझं घराणं हे माझ्यापासूनच सुरू होतं’ हे धाडसी उत्तर देण्याची ताकद असलेल्या पं. वसंतराव देशपांडे यांनी स्वत:ला गायकीतून सिद्ध केलं. पंडित वसंतराव देशपांडे हे एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व. शास्त्रीय संगीतानं नटलेली एखादी बंदिश असो, वा चित्रपटातील भावगीत असो, अथवा नाट्यगीत असो या प्रत्येक संगीत प्रकारावर वसंतरावांची गायकी आपला ठसा उमटवून जाते. या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी, गायक राहुल देशपांडे, अभिनेत्री अनिता दाते, पुष्कराज चिरपुटकर यांच्याशी खास बातचीत करण्यात आली.
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?

