संसदेतून जाताना राहुल गांधी यांनी फ्लाईंग किस दिला; स्मृती इराणी यांचा गंभीर आरोप, पाहा नेमकं काय घडलं…
भाजप नेत्या स्मृती ईराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी फ्लाईंग किस दिल्याचा आरोप स्मृती इराणी यांनी केला आहे.
नवी दिल्ली, 09 ऑगस्ट 2023 | काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेत भाजप सरकारला धारेवर धरलं. त्यानंतर मंत्री स्मृती ईराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार पलटवार केला. स्मृती ईराणी बोलत असताना राहुल गांधी सभागृहाबाहेर पडले. दरम्यान, राहुल गांधी यांनी फ्लाईंग किस दिल्याचा आरोप स्मृती ईराणी यांनी केला. राहुल गांधी हे लोकसभा परिसरातून बाहेर पडत असताना त्यांच्या काही फायली पडल्या. त्यामुळे या फाईली उचलण्यासाठी राहुल गांधी वाकले असता त्यांना पाहून भाजपचे खासदार हसायला लागले. त्यावर राहुल गांधी यांनी या खासदारांना फ्लाईंग किस दिली आणि तिथून हसत निघून गेले.राहुल गांधी यांची ही कृती चुकीची असल्याचं सांगत भाजपच्या 22 महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे धाव घेऊन याबाबतची तक्रार केली. हा महिलांचा अपमान आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्यात यावी. एक महिला विरोधी व्यक्तीच महिला खासदारांना फ्लाईंग किस देऊ शकतो. असा प्रकार यापूर्वी कधी पाहिला नाही. यावरू ते महिलांबाबत काय विचार करतात हे दिसून येतं. ही अभद्र आणि आक्षेपार्ह कृती आहे, अशी टीका स्मृती ईराणी यांनी केली आहे.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

