Solapur : माजी आमदाराच्या मुलाची तरूणाला धमकी अन् शिवीगाळ, VIDEO व्हायरल; घडलं काय?
माजी आमदाराच्या मुलाचा अश्लील भाषेत शिव्या देत असल्याचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. बघा नेमकं घडलं काय?
सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे पुत्र रणवीर राऊत यांचा शिवीगाळ करतानाचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. बार्शीतील एका तरुणाला अश्लील भाषेत शिव्या देत धमकी देतं असल्याचा हा व्हिडीओ असून तो व्हायरल होत आहे. रणवीर राऊत हे बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे पुत्र आहेत. दरम्यान मित्राच्या बहिणीची छेड काढल्याने जाब विचारला, असता यामध्ये कोणालाही दम देण्याचा उद्देश नव्हता, असं रणवीर राऊत यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
तर दुसरीकडे सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. सपाटे यांच्या मालकीच्या लॉजमध्येच 17 आणि 24 जून रोजी विनयभंग केल्याचा पीडित महिलेचा आरोप आहे. सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान या विनयभंग झालेल्या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?

