Solapur Rain | सोलापुरात बोरी आणि हरणा नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यामध्ये सलग दोन दिवस पाऊस सुरु असल्याने बोरी आणि हरणा नदीला पूर आला आहे. या पावसामुळे बोरी उमरगे पुलावर पाणी आल्याने अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी, गाणगापूर या महामार्गावरील गावांचा काल दिवसभर संपर्क तुटला होता.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यामध्ये सलग दोन दिवस पाऊस सुरु असल्याने बोरी आणि हरणा नदीला पूर आला आहे. या पावसामुळे बोरी उमरगे पुलावर पाणी आल्याने अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी, गाणगापूर या महामार्गावरील गावांचा काल दिवसभर संपर्क तुटला होता. मागच्या दोन दिवसांमध्ये 35 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र,या पावसाने ऐन काढणीला आलेले सोयाबीन पीक पाण्याखाली गेले आहे.यामुळे बळीराजाच्या अडचणीमध्ये भर पडली आहे.

सोलापूरमधील जवळगाव मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो

गेल्या चार – पाच दिवसांपासून उत्तरा नक्षत्रातातील पावसाचा लपंडाव सुरू असताना काल वैराग परिसरात जोरादार पावसाचे पुनरागमन झाले. मुसळधार झालेल्या पावसाने जवळगाव मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला असून, ओव्हर फ्लो झाला आहे. काल बार्शी तालुक्‍यात पडलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागच्या एकतीस वर्षात पाचव्यांदा हा प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI