‘रिसॉर्ट अनिल परब आपण बांधला, शिक्षा तर भोगावी लागणार’ : सोमय्या
सोमय्या यांनी, किती खोट बोलाल परब ही संपत्ती तुमचीच आहे. हा साई रिसॉर्ट तुमचाच आहे. त्याचे पुरावे ही सोमय्या यांनी दाखवले. तसेच हा साई रिसॉर्ट तुमचाच असल्याचे सिद्ध होत असल्याने तुम्हालाच शिक्षा भोगावी लागणार असाही इशारा त्यांनी परब यांनी दिला आहे
मुंबई : ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयानं दणका दिला. तसेच त्यांची 10 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. त्यानंतर अनिल परब यांनी मात्र या कारवाईविरोधात कोर्टात जाण्याचं भाष्य केलं आहे. या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसून कारवाई झाली असेल तर याबाबत मी कोर्टात दाद मागणार असल्याचेही परब यांनी म्हटलं आहे. त्यावर आता भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी किती खोटं बोलाल असा टोला परब यांना वगावला आहे.
रत्नागिरीतील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करत आधी आमदार अनिल परब यांना धक्का दिला. त्यानंतर त्यांची कोट्यावधींची मालमत्ताही जप्त केली. यावर ही संपत्ती आली नाही. याशी आपला संबंध नसल्याचे परब म्हणाले
त्यावर आता सोमय्या यांनी, किती खोट बोलाल परब ही संपत्ती तुमचीच आहे. हा साई रिसॉर्ट तुमचाच आहे. त्याचे पुरावे ही सोमय्या यांनी दाखवले. तसेच हा साई रिसॉर्ट तुमचाच असल्याचे सिद्ध होत असल्याने तुम्हालाच शिक्षा भोगावी लागणार असाही इशारा त्यांनी परब यांनी दिला आहे.
Published on: Jan 05, 2023 04:56 PM
तुकाराम मुंढे परळीत येणार म्हणताच पानपट्ट्यांवर टाळे?
काळाचा घाला! 15 प्रवाशांची कार विहिरीत; अन् पुढे जे झालं.....
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
