AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi | 20 दिवसांच्या उपोषणानंतर सोनम वांगचुक रुग्णालयात; मात्र जंतरमंतरवर मोठा गोंधळ

Delhi | 20 दिवसांच्या उपोषणानंतर सोनम वांगचुक रुग्णालयात; मात्र जंतरमंतरवर मोठा गोंधळ

| Updated on: Jul 18, 2026 | 9:49 AM
Share

दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणादरम्यान मोठी घडामोड घडली आहे. प्रकृती खालावल्याने दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केले असून, त्यानंतर जंतरमंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला आहे. सोनम वांगचुक हे गेल्या २० दिवसांपासून नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात कारवाई आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतर येथे उपोषण करत होते.

दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणादरम्यान मोठी घडामोड घडली आहे. प्रकृती खालावल्याने दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केले असून, त्यानंतर जंतरमंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला आहे. सोनम वांगचुक हे गेल्या २० दिवसांपासून नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात कारवाई आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतर येथे उपोषण करत होते. दीर्घकाळ सुरू असलेल्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली असून, त्यांचे सुमारे २० किलो वजन घटल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांच्या स्नायूंवरही परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, प्रकृती बिघडल्याने दिल्ली पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. या कारवाईनंतर जंतरमंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

याआधी दिल्ली उच्च न्यायालयात सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. सुनावणीदरम्यान न्यायालयाने सरकारी डॉक्टरांकडून नियमित वैद्यकीय तपासणी करण्याचे आणि डॉक्टरांच्या अहवालानुसार आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश दिले होते.

दरम्यान, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी सोनम वांगचुक यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून २० जुलै रोजी “चलो संसद” आंदोलनाचे आवाहन केले होते. या व्हिडिओमध्ये त्यांनी नीट पेपरफुटी प्रकरणात विद्यार्थ्यांच्या भविष्याशी झालेल्या अन्यायाचा उल्लेख करत सरकारने जबाबदारी स्वीकारावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पुन्हा केली होती.

या संपूर्ण घडामोडीनंतर विरोधी पक्षांनी आणि विविध सामाजिक संघटनांनी केंद्र सरकारवर टीका करत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत पुढील वैद्यकीय अहवाल आणि आंदोलनाच्या पुढील भूमिकेकडे आता देशाचे लक्ष लागले आहे.

 

Published on: Jul 18, 2026 09:49 AM

Follow Us