मोठी बातमी! सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून हटवताच मोठा गोंधळ; आता अभिजीत दीपके…
दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी आमरण उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना आज सकाळी दिल्ली पोलिसांनी तेथून हटवून सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, कोक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी या आंदोलनाबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी स्वतःही आमरण उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे या आंदोलनाकडे देशभराचे लक्ष लागले आहे.
कोक्रेच जनता पार्टीच्या अधिकृत X हँडलवरून याबाबत माहिती देण्यात आली. पोस्टमध्ये सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केल्याचे सांगण्यात आले आहे.
तसेच, अभिजीत दीपके हे 20 जुलै रोजी दिल्लीतील संसद परिसरात आमरण उपोषण सुरू करणार असल्याचेही जाहीर करण्यात आले. नीट पेपरफुटी प्रकरणात निष्पक्ष चौकशी आणि जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी आंदोलनातून करण्यात येत आहे. या घडामोडींमुळे राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Jul 18, 2026 10:37 AM
मोठी बातमी! सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून हटवताच मोठा गोंधळ; आता...
सोनम वांगचुकांना अडवलं तरी आंदोलन...; शरद पवारांचा केंद्राला इशारा
तोंड दाबलं, मारहाण केली; हे पोलीस नाहीत, हे तर RSS चे गुंड...
20 दिवसांच्या उपोषणानंतर वांगचुक रुग्णालयात; जंतरमंतरवर मोठा गोंधळ