Solapur Crop Loss : पोटाला चिमटे अन् शेतीवर खर्च… मुसळधार पाऊस, बांध फुटला.. सगळं होत्याचं नव्हतं; महिला शेतकरी हतबल
दक्षिण सोलापूरमधील बक्षी हिप्परगा गावात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतीला तलावाचे स्वरूप आले आहे. ओढ्याचे पाणी शेतात शिरल्याने उभी पिके पाण्याखाली गेली आहेत.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगा गावातील महिला शेतकऱ्याचे मोठ्याप्रमाणात नुकसान झालंय. मुसळधार पावसामुळे अनुराधा माळी या महिला शेतकऱ्याचे जवळपास साडे नऊ एकर क्षेत्रातील पिकं जमीनदोस्त झाल्याने त्या चांगल्याच हवालदिल झाल्याचे पाहायला मिळालंय. शेतात अधिक असलेल्या ओढ्यातील पाणी ओव्हर फ्लो झाल्यामुळे संपूर्ण शेतात पाणीच पाणी साचले. यामुळे शेती पिकासह माती देखील पूर्णतः वाहून गेल्याची विदारक स्थिती दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगा गावातील महिला शेतकऱ्याच्या शेताची झालीये. टीव्ही ९ मराठीशी बातचीत करताना या महिला शेतकऱ्याला शेतपीक वाहून गेल्यानं बोलताना मन गहिवरून आलं. ‘आम्ही कष्टाने पिकवलेले उडीद, सोयाबीन, मका संपूर्ण पिकं जमीनदोस्त झालीत. मागील चार दिवसापासून असाच पाऊस पडत आहे मात्र सरकारी यंत्रणा पोहोचली नाही’, असं म्हणत सरकारवर नाराजी व्यक्त केली. तर तात्काळ पंचनामे करून मदत मिळावी, अशी विनंती देखील या महिला शेतकऱ्यानं केली.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

