Special Report | अमृता फडणवीस यांच्याकडून आदित्य ठाकरे यांचा ‘छोटे राजा साहेब’ असा उल्लेख!
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एकच खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या वक्तव्यानंतर राज्यकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. आता 'छोटे राजा साहेब, ह्या पेक्षा मोठी comedy काय होऊ शकते' असं म्हणत अमृता फडणवीस यांनी शिवसेनेचे नेते आणि मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
मुंबईमध्ये वाहतूक कोंडीमुळे 3 टक्के लोकांचे घटस्फोट होतात, असा दावा करून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एकच खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या वक्तव्यानंतर राज्यकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. आता ‘छोटे राजा साहेब, ह्या पेक्षा मोठी comedy काय होऊ शकते’ असं म्हणत अमृता फडणवीस यांनी शिवसेनेचे नेते आणि मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. अमृता फडणवीस यांनी ट्वीट करून पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचले आहे. ‘छोटे राजा साहेब,ह्या पेक्षा मोठी comedy काय होऊ शकते की No.1-CM च्या शहराला Int Co.TomTom च्या Traffic Index Report मधे-City with World’s Worst Traffic’ चा No.1 क्रमांक दिला गेला आहे’ असा दावाच फडणवीस यांनी केला आहे.
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

