Special Report | राज-योगी भेट, युतीचे संकेत?-TV9
मनसे अध्यक्षांनी दादरच्या शिवाजी पार्कातून जाहीरपणे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचं कौतुक केलं. आणि आता भोंग्यावरुन योगींनी जी कारवाई केली, त्याचं राज ठाकरेंनी योगींचं भरभरुन कौतुक केलंय.
मनसे अध्यक्षांनी दादरच्या शिवाजी पार्कातून जाहीरपणे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचं कौतुक केलं. आणि आता भोंग्यावरुन योगींनी जी कारवाई केली, त्याचं राज ठाकरेंनी योगींचं भरभरुन कौतुक केलंय. योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कोणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’. महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना. राज ठाकरेंनी ट्विट करताना योगींचं अभिनंदन केलं. आणि सत्तेचे भोगी म्हणत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. राज ठाकरेंपाठोपाठ अमृता फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला ऐ ‘भोगी’ , कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से, असं ट्विट अमृता फडणवीसांनी केलंय आता प्रश्न हा आहे, की योगींनी उत्तर प्रदेशात असं काय केलं की, राज ठाकरेंनी कौतुक केलं…तर त्याचं कारण आहे, आवाजी मर्यादा निश्चित करण्याबरोबरच योगींनी धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवण्यास सुरुवात केलीय.
Published on: Apr 28, 2022 09:52 PM
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
