Special Report | अभिनेता सोनू सूद इन्कम टॅक्सच्या रडारवर !
आयकर विभागाने अभिनेत्याशी संबंधित सहा ठिकाणी सर्वेक्षण केले होते. पण, आज ज्या प्रकारे अधिकारी पुन्हा अभिनेत्याच्या घरी पोहोचले आहेत, त्यावरून हे स्पष्ट होते की, हे प्रकरण काही मोठे रूप धारण करणार आहे. दरम्यान, दिल्लीतील केजरीवाल सरकारने सोनू सूदला ब्रँड अॅम्बेसेडर घोषित केल्यानंच ही कारवाई करण्यात येत असल्याची टीका करण्यात येत आहे.
आयकर विभागाने अभिनेता सोनू सूदशी (Sonu Sood) संबंधित त्याच्या सहा ठिकाणांवर एक सर्वेक्षण केले. वास्तविक, या सर्वेक्षणाद्वारे, आयकर विभागाने बॉलिवूड अभिनेत्याकडे त्याच्या उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता आहे का, हे शोधण्याचा प्रयत्न केला आहे. आज (16 सप्टेंबर) पुन्हा एकदा आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सोनू सूदच्या घरी सर्वेक्षणाचं काम सुरु आहे. हा छापा नाही, किंवा आयकर विभागाने सोनू सूदच्या कोणत्याही ठिकाणाहून काहीही जप्त केलेले नाही. बातमीनुसार, आयकर विभागाने बुधवारी अभिनेत्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी पाहणी केली होती, कारण अभिनेत्याशी संबंधित अकाऊंट बुकमध्ये गडबड झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. आयकर विभागाने अभिनेत्याशी संबंधित सहा ठिकाणी सर्वेक्षण केले होते. पण, आज ज्या प्रकारे अधिकारी पुन्हा अभिनेत्याच्या घरी पोहोचले आहेत, त्यावरून हे स्पष्ट होते की, हे प्रकरण काही मोठे रूप धारण करणार आहे. दरम्यान, दिल्लीतील केजरीवाल सरकारने सोनू सूदला ब्रँड अॅम्बेसेडर घोषित केल्यानंच ही कारवाई करण्यात येत असल्याची टीका करण्यात येत आहे.
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ

