Special Report | धडाकेबाज अजितदादा! कामाच्या दर्जावरून थेट पोलीस आयुक्तांना सुनावलं
गुप्ता, मला अशा कामाच्या पाहणीला बोलावलं तर मी लय बारीक बघतो. माझ्या भाषेत बोलायचं तर ह छा-छू काम आहे. या ठेकेदाराने पोलिसांचंच काम असं केलं असेल तर बाकीच्यांच काय, असे अजित पवार यांनी म्हटले.
अजित पवार यांनी बुधवारी पुण्यातील पोलीस मुख्यालयाच्या कामाची पाहणी केली. यावेळी कामाचा दर्जा पाहून अजित पवार यांचा पारा चांगलाच चढला. त्यानंतर अजित पवार यांनी थेट आयुक्तांना सुनावले. गुप्ता, मला अशा कामाच्या पाहणीला बोलावलं तर मी लय बारीक बघतो. माझ्या भाषेत बोलायचं तर ह छा-छू काम आहे. या ठेकेदाराने पोलिसांचंच काम असं केलं असेल तर बाकीच्यांच काय, असे अजित पवार यांनी म्हटले. यानंतर अजित पवार यांनी पोलीस मुख्यालयात फिरून बांधकामातील त्रुटी दाखवून दिल्या. तसेच अधिकाऱ्यांना या सर्व त्रुटी सुधारण्याच्या सूचनाही दिल्या.
Follow Us
Latest Videos
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...

