Special Report | शिंदेंचा दे धक्का, बुलेट ट्रेन सुसाट धावणार ! -tv9
थेट जनतेतून नगराध्यक्ष, संरपंच निवडण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं रद्द केला होता. आता शिंदे-फडणवीस सरकारनं पुन्हा जनतेतून नगराध्यक्ष, सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला.
शिंदे-फडणवीस सरकारनं, राज्याच्या जनतेला पहिला दिलासा दिलाय. पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं घेतलाय..पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त होणार आहे. दरात कपात झाल्यानंतर मुंबईत पेट्रोल 111 रुपयांवरुन 106 रुपये प्रतिलिटर होईल. तर डिझेल 97.रुपये 28 पैशांवरुन 94 रुपये 28 पैसे प्रति लिटर होईल. त्यासाठी सरकारच्या तिजोरीवर 6 हजार कोटींचा भार पडेल. पेट्रोल, डिझेलमध्ये नागरिकांना दिलासा देण्याबरोबरच, शिंदे-फडणवीसांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना झटका दिलाय. कारण ठाकरे सरकारचे निर्णय शिंदेंनी बदललेत. थेट जनतेतून नगराध्यक्ष, संरपंच निवडण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं रद्द केला होता. आता शिंदे-फडणवीस सरकारनं पुन्हा जनतेतून नगराध्यक्ष, सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट

