Special Report | राजकीय आरोपांनी ‘जखम’ अजून चिघळणार का?-TV9

खारमध्ये सोमय्यांच्या गाडीवर हल्ला झाला.हल्ल्यानंतर सोमय्यांनी वांद्रे पोलीस स्टेशन गाठलं. सोमय्यांची गाडी वांद्रे पोलीस स्टेशनबाहेर तासभर उभी राहिली. त्यादरम्यान त्यांच्या हनुवटीवर रक्त होतं. सोमय्या बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. मात्र सोमय्यांच्या चेहऱ्यावरच्या ज्या रक्तामुळे हल्ल्याची गंभीरता समोर आली., आता त्याच जखमेवर वैद्यकीय रिपोर्टनं प्रश्न उभे केले आहेत.

दादासाहेब कारंडे

|

Apr 27, 2022 | 9:33 PM

खारमध्ये सोमय्यांच्या गाडीवर हल्ला झाला.हल्ल्यानंतर सोमय्यांनी वांद्रे पोलीस स्टेशन गाठलं. सोमय्यांची गाडी वांद्रे पोलीस स्टेशनबाहेर तासभर उभी राहिली. त्यादरम्यान त्यांच्या हनुवटीवर रक्त होतं. सोमय्या बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. मात्र सोमय्यांच्या चेहऱ्यावरच्या ज्या रक्तामुळे हल्ल्याची गंभीरता समोर आली., आता त्याच जखमेवर वैद्यकीय रिपोर्टनं प्रश्न उभे केले आहेत. ज्या दिवशी हल्ला झाला त्याच दिवशी सोमय्यांना मेडिकल चाचणीसाठी भाभा हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं. हल्ला मोठा होता, मात्र जखम फार गंभीर नव्हती, हे सोमय्या पहिल्या दिवसापासून सांगतायत. पण सोमय्यांच्या हनुवटीवर रक्त कुठून आलं, हा प्रश्न मेडिकल रिपोर्टमुळे उभा राहिलाय. भाभा हॉस्पिटलच्या रिपोर्टनुसार सोमय्यांना झालेल्या जखमेतून कोणताही रक्तस्राव झालेला नाही. किंवा रक्तस्राव होईल, इतकी मोठी इजा झाली नाही. सोमय्यांना जी जखम झालीय, ती 0.1 सेंटीमीटरची आहे. मात्र त्यातून रक्त आलेलं नसल्याचं अहवाल सांगतोय. २ दिवसांपासून सत्ताधाऱ्यांनी जखमेवर उभ्या केलेल्या प्रश्नावर सोमय्यांना विचारणा होतेय, त्यावर सोमय्यांनी काय उत्तरं दिलीयत.

सोमय्यांच्या जखमेवर पहिली शंका पोलिसांनीच वर्तवली कारण हल्ल्यावेळी सोमय्यांच्या हनुवटीवर रक्त होतं. मात्र दुसऱ्या दिवसाच्या पत्रकार परिषदेत चेहऱ्यावर कोणतंही बँडेंज नसल्यामुळे पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यावर याआधी मंत्री छगन भुजबळांनीही प्रश्न उभा केला होता. यानंतर संजय राऊतांनी सोमय्यांच्या हनुवटीवर रक्त नव्हे तर टोमॅटो सॉस असल्याचा दावा केला आणि त्यावर आज सोमय्यांनी उत्तर दिलं. जखम छोटी असो की मोठी असो, सोमय्यांवर हल्ला झाला हे वास्तव आहे. दगडांसोबत काही बॉटल सुद्दा सोमय्यांच्या गाडीवर फेकलं गेल्याचं कॅमेऱ्यांमध्ये टिपलं गेलंय. पण जर वैद्यकीय रिपोर्टनुसार रक्तस्राव झालाच नाही, तर मग सोमय्यांच्या हनुवटीवर रक्त कुठून आलं, हा प्रश्नही अजून अनुत्तरित आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें