Special Report | MIM चा मविआला प्रस्ताव की शिवसेनेविरोधातील डाव? -Tv9
आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत जाण्याची तयारी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दर्शवली आहे. त्यावर संजय राऊत यांनी अतिशय तीव्र विरोध दर्शवला. औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकणाऱ्यांसोबत आम्ही जाणार नाही, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.
औरंगाबादः आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत जाण्याची तयारी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दर्शवली आहे. त्यावर संजय राऊत यांनी अतिशय तीव्र विरोध दर्शवला. औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकणाऱ्यांसोबत आम्ही जाणार नाही, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. त्याला उत्तर देताना खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेला प्रश्न विचारला. तुम्हाला औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकणारे अब्दुल सत्तार चालतात. मग एमआयएम का नकोय? एवढीच हिंमत असेल तर तुम्हाला मुस्लीम मते नकोयत, असे स्पष्ट सांगा, असे आव्हान खासदार जलील यांनी शिवसेनेला दिले आहे. स्वबळावर लढण्याची तुमची तयारी आहे का? तुम्हाला राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कुबड्या घेऊन चालयचे आहे, असा टोलाही खासदार जलील यांनी लगावला.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली

