Special Report | विधानसभेतच फाशी घेणार, Ravi Rana यांचा इशारा -Tv9
अमरावतीच्या महापालिका आयुक्तांवर आमदार रवी राणा यांच्या समर्थकांनी शाईफेक केल्यानंतर रवी राणा यांच्यावर 307 आणि 353चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे आज विधानसभेत पडसाद उमटले. आमदार रवी राणा यांनी या प्रकरणी थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवरच आरोप केले.
मुंबई: अमरावतीच्या महापालिका आयुक्तांवर आमदार रवी राणा यांच्या समर्थकांनी शाईफेक केल्यानंतर रवी राणा यांच्यावर 307 आणि 353चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे आज विधानसभेत पडसाद उमटले. आमदार रवी राणा यांनी या प्रकरणी थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवरच आरोप केले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी फोन केल्यामुळेच माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी खोटं बोलत असेल तर माझ्याकडे पेन ड्राईव्ह असून त्यात सर्व पुरावे आहेत. मी घटनास्थळी नसताना आणि दिल्लीत असताना माझ्यावर गुन्हा दाखल करत असाल तर मी विधानसभेतच फाशी घेईल, असा संतप्त इशारा आमदार रवी राणा यांनी दिला. तर, गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी मुख्यमंत्री किंवा आपण कुणालाही फोन केला नसल्याचं स्पष्ट करत राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........

