Special Report | काय बाई सांगू?… कसं गं सांगू? हटके उदयनराजेंचा न्याराच स्वॅग

खासदार उदयनराजे भोसले कधी कॉलर उडवून डायलॉग मारतात, कधी कार्यकर्त्यांना फ्लाईंग किस देताना, तर कधी गाड्यांवर स्टंट करताना दिसतात. स्टाईल आणि डायलॉगमुळे तर उदयनराजे हे नेहमीच चर्चेत असतात. मात्र आता राजे चर्चेत आहेत ते भर सभेत गायलेल्या गाण्यानं. गुरुवारी सातारा नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात भाजपमधीलच त्यांचे बंधू आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर फिल्मी स्टाईलमध्ये उदयनराजेंनी टिका केली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Dec 24, 2021 | 11:37 PM

खासदार उदयनराजे भोसले कधी कॉलर उडवून डायलॉग मारतात, कधी कार्यकर्त्यांना फ्लाईंग किस देताना, तर कधी गाड्यांवर स्टंट करताना दिसतात. स्टाईल आणि डायलॉगमुळे तर उदयनराजे हे नेहमीच चर्चेत असतात. मात्र आता राजे चर्चेत आहेत ते भर सभेत गायलेल्या गाण्यानं. गुरुवारी सातारा नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात भाजपमधीलच त्यांचे बंधू आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर फिल्मी स्टाईलमध्ये उदयनराजेंनी टिका केली… यावेळी उदयनराजेंनी ‘काय बाई सांगू? कसं गं सांगू? असं म्हणताच सभागृहामध्ये एकच हशा पिकला.

उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंमध्ये शाब्दीक चकमक देखील वारंवार उडत असते. काही दिवसांपूर्वी शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंचा नारळ फोड्या गँग असा उल्लेख केला. त्यानंतर उदयनराजेंनीही आपल्या स्टाईलमध्ये शिवेंद्रराजेंचा समाचार घेतला. शिवेंद्रराजे आणि उदयनराजेंमधील तु-तु मैं-मैं सातारकरांसाठी काही नवीन नाही… मात्र उदयनराजेंच्या हटके स्टाईलनं ती अधिक रंगदार होते.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें