Special Report | महाराष्ट्रातल्या तिन्ही महानगरांना दिलासा, मुंबई-पुणे-नागपूरमध्ये कोरोनावर नियंत्रण

महाराष्ट्रातल्या तिन्ही महानगरांना दिलासा, मुंबई-पुणे-नागपूरमध्ये कोरोनावर नियंत्रण

मुंबई : राज्य सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात रुग्णसंख्या हजारोंच्या संख्येमध्ये आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद अशा मोठ्या शहरांमध्ये तर कारोनाने कहर केला होता. मात्र, कडक निर्बंध आणि नागरिकांनी नियमांचे केलेले योग्य पालन या गोष्टींमुळे सध्या याच मोठ्या शहरांमधील रुग्णसंख्या कमी होताना दिसतेय. रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे नागपूर, मुंबई आणि पुणे या शहरांचे विशेष कौतूक होत आहे. या शहरांनी नेमकं काय केलं ? हे सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट…