Special Report | दसरा मेळाव्यात रामदास कदमांना नो एन्ट्री ?

कोरोना प्रादुर्भावामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार नाही. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात 50 टक्के उपस्थितीत हा दसरा मेळावा पार पडणार आहे. मात्र, यावेळी रामदास कदम यांच्यासाठी नो एन्ट्री असेल, असं सांगितलं जात आहे.

मुंबई : कथित ऑडिओ क्लिपमुळे शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या पक्षांतर्गत अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात रामदास कदमांना एन्ट्री नसेल, अशी माहिती सूत्रांकडून कळतेय. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची घोषणा करण्यात आली आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार नाही. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात 50 टक्के उपस्थितीत हा दसरा मेळावा पार पडणार आहे. मात्र, यावेळी रामदास कदम यांच्यासाठी नो एन्ट्री असेल, असं सांगितलं जात आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. मात्र, त्यासाठी किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्याच एका नेत्यानं रसद पुरवल्याचा आरोप करण्यात येत आहे. मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी तसा गंभीर आरोप केलाय. खेडेकर यांनी या प्रकरणात थेट रामदास कदम यांचं नाव घेतलं आहे. इतकंच नाही तर त्याबाबत एक ऑडिओ क्लिपही समोर आली आहे. त्यात किरीट सोमय्या, रामदास कदम आणि माहिती अधिकार कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांचा संवाद असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, रामदास कदम आणि प्रसाद कर्वे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI