Special Report | काय अंगार-भंगार घोषणा देत आहात? घोषणा करणाऱ्या कार्यकर्त्यांना पंकजा मुंडेंनी झापलं
केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांची जनआशीर्वाद यात्रा आजपासून (16 ऑगस्ट) सुरु होत झाली. मात्र ही यात्रा सुरु होण्याआधीच परळीत राडा पाहायला मिळाला. भागवत कराड परळीत दाखल होताच मुंडे समर्थकांनी पंकडा आणि प्रितम यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. या साऱ्या प्रकारावर पंकजा मुंडे चांगल्याच भडकलेल्या पाहायला मिळाल्या.
भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांची जनआशीर्वाद यात्रा आजपासून (16 ऑगस्ट) सुरु होत झाली. मात्र ही यात्रा सुरु होण्याआधीच परळीत राडा पाहायला मिळाला. भागवत कराड परळीत दाखल होताच मुंडे समर्थकांनी पंकडा आणि प्रितम यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. या साऱ्या प्रकारावर पंकजा मुंडे चांगल्याच भडकलेल्या पाहायला मिळाल्या. अंगार-भंगार घोषणा काय देताय… हे वागणं शोभतं का तुम्हाला… असा प्रकार मला चालणार नाही, परत येऊ नका मला भेटायला, अशा शब्दात त्यांनी राडेबाज कार्यकर्त्यांना झापलं.
आज सकाळी साडे नऊच्या सुमारास भागवत कराड पंकजा मुंडे यांच्या घरी पोहोचले. पंकजा मुंडे यांनी भागवत कराड यांचं स्वागत केलं. परंतु पंकजा मुंडे यांच्या घरासमोर मुंडे समर्थकांनी घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. भागवत कराड दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करुन आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.

छोट्या टॉप आणि जीन्समध्ये आलिया भट्ट, मोकळे केस, काळ्या गॉगलने वाढवलं सौंदर्य

भोजपुरी हॉटनेस क्वीनचा Sunday लूक पाहिला का?

Malaika Arora हिच्या ग्लॅमरस अदा; चाहत्यांच्या नजरा हटेना

virat kohli | विराट कोहली याचा धावण्याचा वेग उसेन बोल्टसारखा, किती वेगाने धावतो विराट

राघव यांच्यापेक्षा परिणीती हिची कमाई अधिक; किती आहे फरक?
