Special Report | चीन, कोरीयासारखा भारतातही कोरोनाचा उद्रेक होणार?
गेल्या 24 तासात मुंबईत फक्त 27 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाहीये. मुंबईत सध्या फक्त 298 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. मुंबईतली परिस्थिती अवघ्या महिन्याभरात नियंत्रणात आली असली तरी चीन, दक्षिण कोरियातल्या कोरोनाच्या बातम्यांनी राज्यासह केंद्र सरकारही सतर्क झालं आहे. अशातच IIT कानपूरमधल्या शास्त्रज्ञांनी जूनमध्ये भारतात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते असा अंदाज वर्तवला आहे.
एकीकडे चीन, दक्षिण कोरियासह फ्रान्स, नेदरलँडमध्ये कोरोना रुग्ण वाढत असताना इकडे मुंबईत कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्याचं दिसतंय. गेल्या 24 तासात मुंबईत फक्त 27 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाहीये. मुंबईत सध्या फक्त 298 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. मुंबईतली परिस्थिती अवघ्या महिन्याभरात नियंत्रणात आली असली तरी चीन, दक्षिण कोरियातल्या कोरोनाच्या बातम्यांनी राज्यासह केंद्र सरकारही सतर्क झालं आहे. अशातच IIT कानपूरमधल्या शास्त्रज्ञांनी जूनमध्ये भारतात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते असा अंदाज वर्तवला आहे.
काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही कोरोनाला हलक्यात घेऊ नका असा इशारा दिलाय. कोरोनाच्या तीन लाटांच्या परिस्थितीचा आपणा सर्वांनाच अनुभव आहे. कधी कोरोनाचे रुग्ण वाढतील आणि कधी परिस्थिती गंभीर होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन केलेलं बरं.
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

