AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | परमबीर सिंहांना सुप्रीम कोर्टाकडून चपराक

Special Report | परमबीर सिंहांना सुप्रीम कोर्टाकडून चपराक

| Edited By: | Updated on: Nov 18, 2021 | 9:26 PM
Share

अजित पवार यांच्याबद्दल काही करता येत नाही. म्हणून राज्य सरकार अस्थिर करण्यासाठी त्यांच्या बहिणीच्या घरात धाडसत्र सुरु केलं. अजित पवार यांच्या घरी आयटीचे लोक पाच दिवस बसले. ते दिल्लीचे आदेश होते. हसन मुश्रीफ यांच्याबद्दल चौकशी करतात. महाराष्ट्र राज्य हातचं गेलं, ते परत मिळत नाही. म्हणून ईडीच्या माध्यमातून त्रास दिला जातो. तुम्ही कितीही त्रास द्या. सामान्य जनता तुम्हाला कहीही सत्तेत येऊ देणार नाही. जनता आज ना उद्या वसूल करेल, असा घणाघात पवारांनी केलाय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. तसंच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं कौतुक करत, देशमुखांनी राष्ट्रवादीची जबाबदारी समर्थपणे सांभाळली असं म्हटलं. त्यामुळे शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस खंबीरपणे पाठीशी उभं असल्याचं पाहायला मिळत आहे.

गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदा असं झालं आहे की मी नागपुरात आलो आणि माझ्यासोबत अनिल देशमुख नाहीत. अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादीची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. केंद्रातील सत्तेचा गैरवापर करुन राज्यातील सत्ता अस्थिर करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरु आहे. या सरकारमध्ये राष्ट्रवादी महत्वाचा भाग आहे. काही लोकांना सत्ता हातातून गेल्याने अस्वस्थता आलीय. अस्थिरता निर्माण करायला अखंड प्रयत्न केलाय. वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून छळवाद सुरु केल्याचा आरोप पवारांनी केलाय. मुंबईचे पोलीस आयुक्त माझ्याकडे आले आणि त्यांनी अनिल बाबूंबद्दल ही तक्रार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. अनिल देशमुख याचा दोष काय? हे मला समजत नाही. शहानिशा होईपर्यंत मी सत्तेत राहत नाही, असं मला देशमुख यांनी सांगितलं आणि स्वाभिमानाने त्यांनी राजीनामा दिला, असंही पवारांनी सांगितलं.

तसंच राज्य सरकारनं जाहीर केलंय की परमबीर सिंग भगोडा आहे. परमबीर यांनी केलेले आरोप खोटे आहेत. खोटे आरोप करणारा अधिकारी बाहेर आहे आणि अनिल देशमुख आत आहेत. सत्ता गेली म्हणून काही लोक अस्वस्थ आहेत. ते केंद्राकडे लिस्ट पाठवतात आणि त्याची चौकशी करायला सांगतात. संजय राऊत यांच्या पत्नीली ईडीची नोटीस बजावली. अजित पवार यांच्याबद्दल काही करता येत नाही. म्हणून राज्य सरकार अस्थिर करण्यासाठी त्यांच्या बहिणीच्या घरात धाडसत्र सुरु केलं. अजित पवार यांच्या घरी आयटीचे लोक पाच दिवस बसले. ते दिल्लीचे आदेश होते. हसन मुश्रीफ यांच्याबद्दल चौकशी करतात. महाराष्ट्र राज्य हातचं गेलं, ते परत मिळत नाही. म्हणून ईडीच्या माध्यमातून त्रास दिला जातो. तुम्ही कितीही त्रास द्या. सामान्य जनता तुम्हाला कहीही सत्तेत येऊ देणार नाही. जनता आज ना उद्या वसूल करेल, असा घणाघात पवारांनी केलाय.