Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Buldhana Video : पुरस्कार विजेत्या युवा शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळलं, 3 पानांची सुसाईड नोट अन्..., कारण नेमंक काय?

Buldhana Video : पुरस्कार विजेत्या युवा शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळलं, 3 पानांची सुसाईड नोट अन्…, कारण नेमंक काय?

| Updated on: Mar 13, 2025 | 2:14 PM

सणाच्या दिवशीच राज्य शासनाचा युवा पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याची आत्महत्या झाल्याची बातमी समोर येत आहे. शेतकऱ्यांना खडकपुर्णा जलाशयातून शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने शासनाच्या निषेधार्थ आत्महत्या केली आहे. युवा शेतकरी कैलास नागरे यांच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येतेय

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यातील शिवनी आरमाळ येथील प्रगतीशील आणि राज्य पुरस्कार प्राप्त युवा शेतकरी कैलास अर्जुन नागरे यांनी आज सकाळी आत्महत्या केली आहे. आपल्या शेतात विषारी औषध घेऊन त्यांनी आपलं आयुष्य संपवलं आहे. आत्महत्या पूर्वी त्यांनी तीन पानी सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. कैलास नागरे या युवा शेतकऱ्यांने अनेक दिवसापासून देऊळगाव राजा परिसरातील शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून शाश्वत पाणी मिळावं यासाठी लढा सुरू केला होता. गेल्या डिसेंबर महिन्यात त्यांनी दहा दिवस अन्नत्याग आंदोलनही केलं होतं . मात्र परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने मी आत्महत्या करत असल्याचे त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. कैलास नागरे हे या परिसरातील शेतकऱ्यांचे आवडते युवा शेतकरी असल्याने जोपर्यंत पालकमंत्री किंवा जिल्हाधिकारी या ठिकाणी येऊन दिवंगत कैलास नागरे यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा ठोस आश्वासन देत नाही, तोपर्यंत शेतातून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पोलिसांना नेऊ देणार नाही, अशी भूमिका घेतल्याने या ठिकाणी तणाव निर्माण झाला आहे. सध्या पोलीस या ठिकाणी दाखल झाले असून काही वेळापूर्वीच ही आत्महत्या केली असल्याने मोठ्या प्रमाणात हजारो शेतकरी या ठिकाणी जमल्याची माहिती मिळतेय

Published on: Mar 13, 2025 02:14 PM