Ahilyanagar Video : धक्कादायक! गावातील विहिरीत डोकं नसलेला मृतदेह पाहिला अन्… बघा व्हिडीओ
अहिल्यानगरच्या दाणेवाडी गावात छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा मृतदेह एका पोत्यात बांधून विहिरीत टाकला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
अहिल्यानगरच्या दाणेवाडी गावातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. दाणेवाडी गावात असणाऱ्या एका विहिरीत मृतदेह सापडला आहे. छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळल्याने अहिल्यानगरच्या दाणेवाडी गावात एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृतदेहाला शीर नसल्यानं ओळख पटण्यास अडचण येत असल्याची माहिती समोर येत आहे. मृतदेह विहिरीत फेकण्यापूर्वी या मृतदेहाचे अवयव काढून घेतले आहे. हा मृतदेह एका पोत्यात बांधून विहिरीत टाकला होता. हा मृतदेह नेमका कोणाचा आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, सकाळच्या वेळेला काही लोकांनी हा पोत्यातील मृतदेह विहिरीतील पाण्यात तरंगताना दिसला असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान घडलेल्या धक्कादायक प्रकारासंदर्भात गावकऱ्यांनी पोलिसात तक्रार दिली. यानंतर हा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. तर हा मृतदेह पोत्यात बांधून टाकल्याने नेमका तो मृतदेह कोणाचा आहे याची ओळख पटत नसल्याची माहिती देखील प्रत्यक्षदर्शींनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधताना दिली.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

