Ladki Bahin Yojana Video : ‘लाडकी बहीण’मुळे कडकी, रामदास कदमांची कबुली, ‘योजना बंद केली तर…’
निवडणुकांआधी लाडकी बहीण योजनेच्या प्रचारावरून महायुतीमध्ये स्पर्धा रंगलेली होती. पण बजेटमधल्या तरतुदीनंतर सवाल उभे राहिल्याने लाडकी बहिण योजना ही फक्त राष्ट्रवादीचीच नव्हे तर संपूर्ण सरकारची असल्याचं उत्तर अजित पवारांनी दिलंय. तर दुसरीकडे रामदास कदम यांनी तर लाडकी बहिण योजनेऐवजी इतर १० योजना होऊ शकतात असं विधान केलय.
आमचं सरकार कधीच लाडकी बहीण योजना बंद करणार नाही या महायुती सरकारच्या वायद्यावर त्यांच्याच नेत्यांच्या विधानांनं प्रश्न उभा केलाय. विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका असं म्हणत महायुतीचे तीनही प्रमुख नेते प्रचारामध्ये लाडक्या बहिणींना आश्वस्त करत होते. पण निवडणुकीनंतर रामदास कदमांच्या विधानाने भूवय्या उंचावल्यात. ‘लाडकी बहीण योजना बंद केली तर दुसऱ्या योजना सुरू करता येतील’, असं वक्तव्य शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केलं आहे. इतकंच नाहीतर बजेट डोळ्यासमोर ठेऊन सगळ्या योजना चालू कराव्या लागतात. अंथरुन पाहूनच पाय पसरावे लागतात. आज आपण लाडकी बहीण योजनेचे बजेट पाहिलं, तर तीस हजार कोटींपेक्षा जास्त आहे. या सगळ्या गोष्टी डोळ्यांसमोर ठेऊन आपल्याला विकासाची वाटचाल करावी लागते, असही रामदास कदम म्हणाले.
दरम्यान, रामदास कदम हे सत्ताधारी पक्षाच्या बाजूचे आहेत त्यांचे चिरंजीव मंत्रिमंडळात आहेत त्यामुळे त्यांचा बोलवता धनी जर सरकारमध्ये बसला असेल तर आमच्या लाडक्या बहिणींनी काळजी करण्यासारखी ही बाब असल्याचे विरोधकांचे म्हणणं आहे. यदांच्या आर्थिक वर्षामध्ये एका महिला बालकल्याण विभागासाठी ३१,९०७ कोटी इतका निधी दिला गेलाय ही वाढ लाडक्या बहिणीमुळे झाली आहे. यानंतर उर्जा विभागासाठी २१,५३४ कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागासाठी १९,०७९ कोटी शालेय विभागासाठी २९०० कोटी उच्च शिक्षणासाठी ८१० कोटी आणि पाच कोटी इतकी सर्वात कमी रक्कम ही दुग्ध विकास विभागासाठी देण्यात आली आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

