Special Report | बाळासाहेब ठाकरे यांनी युती तोडण्याची मानसिकता केली होती?
दहा वर्षापूर्वीच त्यांनी भाजपसोबतची युती तोडण्याची मानसिकता केली होती. आम्ही काँग्रेससोबत असताना सेनेकडून राष्ट्रवादी सोबत आली पाहिजे असा प्रस्ताव होता. परंतु काही कारणामुळे जमले नाही. मात्र 2019मध्ये आघाडीचा निर्णय झाला, असं मलिक म्हणाले.
मुंबई: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जिवंत असतानाच शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडण्याची मानसिकता तयार केली होती. राष्ट्रवादीसोबत आघाडीचा प्रस्तावही शिवसेनेकडून देण्यात आला होता. मात्र काही कारणाने त्यावेळी दोन पक्ष एकत्र येऊ शकले नाहीत, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. मलिक यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी युतीचा निर्णय घेतला होता, तसाच त्यांनी युतीतून बाहेर पडण्याचा विचारही केला होता. दहा वर्षापूर्वीच त्यांनी भाजपसोबतची युती तोडण्याची मानसिकता केली होती. आम्ही काँग्रेससोबत असताना सेनेकडून राष्ट्रवादी सोबत आली पाहिजे असा प्रस्ताव होता. परंतु काही कारणामुळे जमले नाही. मात्र 2019मध्ये आघाडीचा निर्णय झाला, असं मलिक म्हणाले.
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
