Sudhakar Badgujar : नाराजीनाट्यानंतर सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश
Sudhakar Badgujar Joins BJP : नाशिकचे ठाकरे सेनेचे नेते सुधाकर बडगुजर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत बबन घोलप हे देखील भाजपात गेले आहेत.
नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. सुधाकर बडगुजर आणि घोलप यांनी आज भाजपचा झेंडा हाती घेतलेला आहे. मोठं शक्ती प्रदर्शन करत बडगुजर यांनी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र बडगुजर यांच्या प्रवेशाच्या आधी भाजपमध्ये नाट्य बघायला मिळालं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांना या पक्ष प्रवेशाची कल्पनाच नव्हती. बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केला होता, मात्र हा विरोध झुगारून बडगुजर यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यांच्यासोबत बबन घोलप आणि काँग्रेस तसेच इतर पक्षांमधील अनेक माजी पदाधिकारी आणि नगरसेवकही भाजपमध्ये दाखल झाले आहेत.
दरम्यान, आज माझा भाजपमध्ये प्रवेश झाला. मी भाजपच्या नेत्यांचे आभार मानतो. मी समाजासाठी झटतो, समाजाची सेवा करतो. कोरोना काळात मी अनेक रक्तदान शिबीरे घेतली. कोणी बाहेर येत नव्हते त्यावेळी मी कोविड सेंटर सुरु केलं. पक्षासाठी काम केलं. परंतू नियतीने घाला घातला आणि माझ्यावर कारवाई केली. ज्या पक्षाने माझा अनादर केला, त्या पक्षाला मी सांगू इच्छितो की, महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असं बडगुजर यांनी या पक्षप्रवेशाच्या नंतर म्हंटलं आहे.

मुलींच्या शरीरावरून कमेंट्स; पोलीस भरती तयारी करणाऱ्यांना मारहाण अन्..

आदित्य ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल, वांद्रे जमीन पुनर्विकासावरून सवाल

भारतीय नर्स निमिषा प्रियाला दिलासा, येमेनमधील उद्याची फाशी टळली

मुंबईत मुसळधार, अंधेरी सबवे पाण्याखाली; वाहतूक कोंडी
