Sudhakar Badgujar बडगुजर भाजपचा झेंडा हाती घेण्याच्या तयारीत; बावनकुळेंना मात्र खबरच नाही
Maharashtra politics Updates : ठाकरे गटाचे नाशिकचे नेते सुधाकर बडगुजर हे भाजपमध्ये प्रवेशासाठी मुंबईला निघाले आहेत. मात्र त्यांच्या पक्ष प्रवेशाबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलं आहे.
भाजप प्रवेशासाठी ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी बडगुजर हे मोठ ताफा घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी त्यांच्या कुटुंबाकडून त्यांचं औक्षण देखील करण्यात आलं आहे. पक्ष प्रवेशासाठी आपल्याला दुपारी 1 वाजताची वेळ दिलेली असल्याचं बडगुजर यांनी म्हंटलं आहे. बडगुजर हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत बडगुजर भाजपमध्ये जाणार असल्याने त्यांच्या या पक्ष प्रवेशाने ठाकरे गटाला फटका बसणार आहे.
दरम्यान, सुधाकर बडगुजर यांच्या या पक्ष प्रवेशाची माहिती आपल्याला नसल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे एकीकडे बडगुजर यांचा ताफा अर्ध्या रस्त्यात पोहोचला असताना बावनकुळे यांनी केलेल्या या विधानाने संभ्रम निर्माण झाला आहे. प्रसार माध्यमांनी बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारल्यावर त्यांनी म्हंटलं की, सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही. जोपर्यंत स्थानिक टीम असते, पदाधिकारी, खासदार आमदार त्यांच्याशी सल्लामसलत एकमत झाल्याशिवाय आमच्याकडे पक्षप्रवेश होत नाही. आमच्याकडे बडगुजरांच्या पक्षप्रवेशाला स्थानिक पदाधिकऱ्यांचा विरोध आहे. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही, असं बावनकुळे यांनी म्हंटलं आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

