AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BJP News : भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल

BJP News : भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल

| Updated on: May 13, 2025 | 5:14 PM

BJP Announces New District Presidents : भाजपाकडून नव्या जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आलेली आहे. ३६ जिल्ह्यांसाठी एकूण ५८ नवीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली आहे.

महाराष्ट्र भाजपामध्ये संघटनात्मक फेरबदल करण्यात आलेले आहेत. भाजपाकडून नव्या जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आलेली आहे.

पक्ष संघटनेत बळकटी आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाने राज्यात हे संघटनात्मक फेरबदल केले आहेत. पक्षाने राज्यातील ३६ जिल्ह्यांसाठी एकूण ५८ नवीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली आहे. या निवडी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. विशेष म्हणजे, मुंबई जिल्हाध्यक्षपदासाठी तीन पदे तयार करण्यात आली ५८ नावांपैकी काही नावांवर शिक्कामोर्तब झालेलं असलं तरी काही नावांना अद्यापही सहमती मिळालेली नाही. यापूर्वी, राज्यातील मंडळ आणि तालुका अध्यक्षांच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या, त्यानंतर आता जिल्हाध्यक्षांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाले आहे.

Published on: May 13, 2025 05:14 PM