MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5.30 PM | 30 September 2021

शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदाकर टीका केली आहे. 'भाजीपाला विकणारे भुजबळ 25 वर्षात 25 हजार कोटींचे मालक कसे झाले? असा सवाल त्यांनी केला आहे.

भाजीपाला विकणारे छगन भुजबळ 25 वर्षात 25 हजार कोटींचे मालक कसे झाले? असा सवाला करतानाच भुजबळांनी अधिकार नसतानाही नियोजन निधीचं वाटप केलं. त्यामुळे त्यांचं पालकमंत्रीपद काढून घ्या, अशी मागणी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी केली. त्यामुळे कांदे-भुजबळ वाद आणखी विकोपाला जाणार असल्याचं सांगितलं आहे.

सुहास कांदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन छगन भुजबळांवर जोरदार हल्ला चढवला. भुजबळ हे केवळ भाई युनिव्हर्सिटीचे विद्यार्थीच नाही तर प्राचार्य आहेत. भुजबळांविरोधात माझ्याकडे पुरावे आहेत. हे सर्व पुरावे मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिले आहेत. गुन्हेगार कधीच गुन्हा केला नाही हेच सांगत असतो, असं कांदे म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI