Baramati By-Election Results 2026 | सुनेत्रा पवारांचा दणदणीत विजय! बारामती पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर
महाराष्ट्र विधानसभेच्या दोन महत्त्वपूर्ण पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर होत असताना बारामती विधानसभा मतदारसंघात ऐतिहासिक घडामोड पाहायला मिळाली आहे. माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या मतदारसंघात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी विक्रमी आघाडी घेत मोठा विजय मिळवण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे.

बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो आणि याच परंपरेला पुढे नेत सुनेत्रा पवार यांनी मतदारांचा प्रचंड विश्वास संपादन केला आहे. सुनेत्रा पवार यांना 19 व्या फेरीअखेर मिळालेल्या आकडेवारीनुसार, त्या तब्बल 1 लाख 68 हजार मतांनी आघाडीवर आहेत. एका पोटनिवडणुकीत इतक्या मोठ्या फरकाने आघाडी घेणाऱ्या त्या राज्यातील पहिल्या उमेदवार ठरत आहेत.
सुनेत्रा पवार यांच्या या विजयाने बारामतीच्या राजकारणात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. २ लाखांहून अधिक मताधिक्य मिळवणे ही केवळ लाट नसून सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वावर जनतेने दिलेली मोठी मोहोर आहे. या विजयानंतर बारामती आणि राहुरी दोन्ही ठिकाणी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला आहे.
सुनेत्रा पवारांचा दणदणीत विजय! बारामती पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर...
राहुरीत अक्षय कर्डिलेंना घवघवीत यश, इतक्या मतांनी विजय
5 राज्यांचे निकाल: 3 ठिकाणी सत्तांतर; बॅनर्जींच्या गडावर भाजपचा झेंडा?
प. बंगालच्या आसनसोलमध्ये उसळली हिंसा, TMC कार्यालयात तोडफोड, नेमकं काय