SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 20 July 2021

मी भाग्यवान आहे की मला इतक्या जवळून महापूजेचा बहुमान मिळाला. लाखो भाविक कळसाचे दर्शन घेऊन परतत आहेत. मी मोठं काहीही केलेलं नाही. तुडुंब पंढरपूर, आनंदाची उधळण असते, ते वातावरण आम्हाला सर्वांना हवंय. लवकरात लवकर ते वातावरण आपल्याला मिळावे, अशी मी विठुराया चरणी प्रार्थना करतो,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

आज 20 जुलै रोजी देवशयनी एकादशी आहे. आजपासून चातुर्मास सुरू होणार आहे. मान्यता आहे की भगवान चातुर्मासादरम्यान योग निद्रेमध्ये जातात. अशा परिस्थितीत या चार महिन्यांत कोणतेही शुभ कार्य केले जात नाही कारण हिंदु धर्मग्रंथांमध्ये देवाचे आशीर्वाद घेतल्याशिवाय कोणतेही काम पूर्ण मानले जात नाही. म्हणूनच देवउठनी एकादशीच्या दिवशी जेव्हा जगाचे पालनकर्ता भगवान विष्णू योग निद्रेतून जागे होतात, तेव्हा शुभ कार्ये सुरु होतात

आषाढी एकादशीनिमित्त महापूजेसाठी वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते (वय 71 वर्ष) आणि इंदुबाई केशव कोलते (वय 60 वर्ष) यांना महापूजा करण्याचा मान मिळाला. केशव कोलते 20 वर्षांपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विणेकरी म्हणून सेवा बजावत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI