सत्तासंघर्षावरील निकालाचं काऊंटडाऊन सुरू? राजकीय पेच प्रसंगावर शरद पवार म्हणाले…
VIDEO | राज्यातील सत्तासंघर्षावर निकाल याच आठवड्यात लागण्याची शक्यता, शरद पवार यांनी यावर काय केलं भाष्य?
मुंबई : सत्तासंघर्षाचा निकाल याच आठवड्यात लागण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे निकाल नेमका काय लागणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदारांचं काय होणार? यावरुन दावे-प्रतिदावेही सुरु झाले आहेत. दरम्यान, सत्तासंघर्षावरील निकालाचं काऊंटडाऊन सुरू झालं असून ११ मे रोजी निकाल लागण्याच्या शक्यतेनेही जोर धरला आहे. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही निकाल लवकर लागण्याच्या शक्यतेवर भाष्य केले आहे. शरद पवारांनीही (Sharad Pawar) म्हटलंय की, सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच लागेल. आता लवकर म्हणजे किती? तेही जाणून घेणं महत्त्वाचं आहे. सध्या चर्चा सुरु असल्यानं कर्नाटकात 10 मे रोजी मतदान आहे आणि कर्नाटकच्या विधानसभेचा निकाल 13 मे ला आहे. त्यातच घटनापीठातील 5 न्यायमूर्तींपैकी एक न्यायमूर्ती निवृत्त होत आहेत, असे शरद पवार यांनी म्हटले तर एम.आर.शाह 15 मे रोजी निवृत्त होत आहेत आणि 20 मे पासून सुप्रीम कोर्टाची उन्हाळी सुट्टी सुरु होतेय. त्यामुळे आता या 5 तारखांपैकी 3 दिवस फार महत्वाचे आहे. 10, 11 आणि 12 तारीख. त्यामुळे या 3 दिवसांत निकाल लागण्याची शक्यता आहे.
Published on: May 09, 2023 10:38 AM
सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणी
एकच खळबळ! मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; थेट पोलिसांवर
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं
पावसाने दिला दगा! 50 हजार खर्च करूनही परळीत सोयाबीनने टाकल्या माना
