Supriya Sule : सिलिंडरचे भाव वाढले, सुप्रिया सुळे म्हणतात ‘भाऊबीजेला सिलिंडर भेट मागणार’
मागील काही महिन्यांपासून इंधन तसेच गॅसचे दर सातत्याने वाढत आहेत. पेट्रोल तसेच डिझेलचे दर थेट शंभरीपार गेल्यामुळे सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. याच मुद्यावरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकार तसेच भाजपवर निशाणा साधलाय.
देशात मागील काही महिन्यांपासून इंधन तसेच गॅसचे दर सातत्याने वाढत आहेत. पेट्रोल तसेच डिझेलचे दर थेट शंभरीपार गेल्यामुळे सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. याच मुद्यावरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकार तसेच भाजपवर निशाणा साधलाय. त्यांनी “इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडं मोडलंय. आर्यन खान जितके दिवस जेलमध्ये होता त्या दिवासात पेट्रोल आणि डिझेलचे भाव किती वाढलेत ते बघा. मी संसदेत गॅसचे दर कमी करण्याची मागणी करणार आहे,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच दिल्लीत आपलं सरकार आल्यावर पहिल्यांदा गॅसचे दर कमी करणार, असे आश्वासन सुप्रिया सुळे यांनी दिले. त्या पुण्यात बोलत होत्या.
Latest Videos
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!

