AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supriya Sule | महिला आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत; सुप्रिया सुळे यांचा थेट सरकारला सवाल, 2023मध्येच विधेयक मंजूर, मग अंमलबजावणी का नाही?

Supriya Sule | महिला आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत; सुप्रिया सुळे यांचा थेट सरकारला सवाल, 2023मध्येच विधेयक मंजूर, मग अंमलबजावणी का नाही?

| Updated on: Apr 21, 2026 | 12:12 PM
Share

महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट भूमिका मांडत केंद्र सरकार आणि भाजपवर सवाल उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटलं की, “भाजपला जर खरोखरच महिलांना 33 टक्के आरक्षण द्यायचं असेल, तर त्यांना कोणीही थांबवलेलं नाही.” सुळे यांनी 21 सप्टेंबर 2023 रोजी लोकसभेत महिला आरक्षण विधेयक एकमताने मंजूर झाल्याची आठवण करून दिली.

महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट भूमिका मांडत केंद्र सरकार आणि भाजपवर सवाल उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटलं की, “भाजपला जर खरोखरच महिलांना 33 टक्के आरक्षण द्यायचं असेल, तर त्यांना कोणीही थांबवलेलं नाही.”
सुळे यांनी 21 सप्टेंबर 2023 रोजी लोकसभेत महिला आरक्षण विधेयक एकमताने मंजूर झाल्याची आठवण करून दिली. “हे विधेयक मंजूर झाल्यानंतर 2024 पर्यंत त्याची अंमलबजावणी होऊ शकली असती. 543 लोकसभा जागांपैकी 33 टक्के महिलांना आरक्षण देण्याची आमची मागणी होती. त्यासाठी आम्ही रात्रभर चर्चेला बसायलाही तयार होतो,” असं त्या म्हणाल्या.
तसेच, “मुख्यमंत्री म्हणतात की महिलांना 33 टक्के आरक्षण देता येईल, पण पक्षात देता येत नाही. मग अंमलबजावणी का होत नाही?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, सुळे यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा उल्लेख करत, “तिथे 40 ते 50 टक्के महिला खासदार आहेत,” असं सांगितलं. या पार्श्वभूमीवर महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

 

Published on: Apr 21, 2026 12:12 PM

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या