आपल्याकडे म्हणतात ना ते… सुर्यकुमार यादवची मराठी ऐकली का? पहा दहीहंडी उत्सवातील मजेदार व्हिडीओ
ठाणे शहरात संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवाने एक अनोखा उत्साह अनुभवला. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव यांनी या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावत गोविंदा पथकांचा जोश द्विगुणीत केला. या निमित्ताने दहीहंडीच्या परंपरेला आणि मातीतल्या खेळाला अधिक प्रोत्साहन मिळाले.
ठाणे शहरात संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवाने एक अनोखा उत्साह अनुभवला. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव यांनी या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावत गोविंदा पथकांचा जोश द्विगुणीत केला. या निमित्ताने दहीहंडीच्या परंपरेला आणि मातीतल्या खेळाला अधिक प्रोत्साहन मिळाले.
कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर सूर्यकुमार यादव यांनी उत्सवातील वातावरण गरमागरमीचं असल्याचे सांगितले. “जसा यांनी पूर्ण तयार केलंय, इतकी ऊर्जा, इतकं जे पॅशन आहे,” असे म्हणत त्यांनी आयोजकांचे कौतुक केले. या उत्साहासाठी आणि पारंपरिक खेळाला मिळणाऱ्या पाठिंब्यासाठी प्रताप सर आणि पूर्वेश दादा यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. “हा आपल्याकडे म्हणतात ना, मातीतला खेळ आहे हा. मातीपासून मॅटपर्यंतचा प्रवास, यांच्यामुळे, इतकं छान यांनी व्यासपीठ दिलं आहे, संधी दिली आहे, तर मला असं वाटतं की हा येत्या काळात खूप मोठा खेळ झाला पाहिजे,” असे म्हणत त्यांनी दहीहंडी खेळाच्या भविष्याबद्दल आशावाद व्यक्त केला. क्रिकेट आणि गोविंदा या दोन्ही मैदानांमधील तुलनेबद्दल विचारले असता, सूर्यकुमार यादव यांनी मिश्किलपणे उत्तर दिले. “आता तर मी थोडा क्रिकेटमधून मोकळा आहे, तर इथे आल्यावर थोडं जास्त पॅशन फॉलो होतंय,” असे सांगत त्यांनी दहीहंडीच्या ऊर्जेचे कौतुक केले.
गोविंदा पथकांना संदेश देताना त्यांनी महत्त्वाचा सल्ला दिला. “मी फक्त हेच सांगू इच्छितो की अशीच मेहनत करत राहा. संधी पुढे येत राहतील, व्यासपीठ देण्यासाठी लोक तयार आहेत. कारण लोक बघत आहेत, तुम्ही लोकं मेहनत करत आहात आणि जशीच तुम्हाला पुढे संधी मिळेल, तिला लगेच पकडा,” असे आवाहन करत त्यांनी गोविंदांना परिश्रम आणि चिकाटीचे महत्त्व पटवून दिले.
Published on: Sep 05, 2026 01:59 PM
आपल्याकडे म्हणतात ना ते... सूर्यकुमार यादवची मराठी ऐकली का?पहा दहीहंडी
मुंबईच्या दहीहंडीला गालबोट! दुपारपर्यंत तब्बल 22 गोविंदा जखमी; एकावर..
धमकीला भीक न घालता... शिवसेनेतील बड्या नेत्याने भर मंचावरून मोठं विधान
दहीहंडीचा सांगाडा काढताना काळाचा घाला! पिंपरी-चिंचवडमध्ये लोखंडी...

